रामगिरी महाराजांच्या विधानामुळे मुस्लिम समाजात संताप, जळगावात दोन तक्रारी दाखल
रामगिरी महाराज संस्थान श्री क्षेत्र गोदावरी धाम यांनी मुस्लिम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विरुद्ध आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करताना व्हिडिओमध्ये अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या जीवन चरित्र बाबत अत्यंत लज्जास्पद व स्त्रियांवर अत्याचार करणारे होते व तेच इस्लाम धर्माचे आदर्श आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करून भारतातील नव्हे तर संपूर्ण जगातील इस्लाम धर्मीयांच्या भावना दुखावलेल्या आहेत.
रामगिरी महाराज यांचे हे वक्तव्य पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे त्यांनी केले असून सदरचे वृत्त हे एबीपी माझा व इतर बातम्यांच्या माध्यमा द्वारे जळगावात प्रसिद्ध झाल्याने जळगाव शहर पोलीस स्टेशन जळगाव येथे अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष मजहर खान यांनी तर एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव येथे एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अहमद हुसेन यांनी लेखी एफ आय आर दिलेली आहे .
शहरातील प्रमुखांचे शहर पोलीस स्टेशनला साकडे
जळगाव शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यरत असलेले मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, एमआयएमचे अध्यक्ष अहमद हुसेन, काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख सलीम इनामदार, ए यू सिकलगर फाउंडेशनचे अध्यक्ष अन्वर खान, अल इमदाद चे मतीन पटेल,अलखैर ट्रस्टचे अध्यक्ष युसूफ शाह,सुन्नी जमातचे तांबापूर चे प्रमुख तोफिक शरीफ शाह व तौहिद बेग, शिकलगर बिरादरीचे मुजाहिद खान, उस्मानिया फाउंडेशनचे अध्यक्ष नाजीम पेंटर, बी वाय एफ चे शिबान शेख,कादरीया फाउंडेशनचे अध्यक्ष फारुख कादरी, आदींनी शहर पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष जाऊन तक्रार दिली असता एफ आय आर ही एकाच्या नावे देण्यात यावी अशी सूचना मिळाल्याने मझहरखान यांनी तक्रार दिलेली आहे.
दोन्ही तक्रारीवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई तीन दिवसात न झाल्यास पुढील लोकशाही मार्गाने कारवाई करण्याचा इशारा या शिष्टमंडळाने एका पत्रकाद्वारे दिलेला आहे.
फोटो कॅप्शन.
जळगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करताना मजहर खान सोबत फारुक शेख, सलीम इनामदार, मतीन पटेल,अहमद हुसेन आदि दिसत आहे
Leave A Comment