सलीम खानची हत्या करण्याचा कट – बम बनवण्याचे प्रशिक्षण घेऊन स्फोटकांचा वापर; एकता संघटनेची आरोपींवर कठोर कारवाईची मागणी..
जळगाव शहरातील ट्रान्सपोर्ट व्यवसायिक सलीम बशीर खान (वय ४५) यांना ट्रकसह ठार मारण्याचा गंभीर प्रयत्न करण्यात आला. आरोपी धीरज राणे आणि जितेंद्र राणे यांनी ट्रकमध्ये स्फोटक साहित्य ठेवून सलीम खानच्या जीवाला धोका निर्माण केला. मात्र, या प्रकरणात त्यांच्यावर केवळ ज्वलनशील पदार्थाने आग लावण्याचा गुन्हा (गुन्हा क्रमांक ४९८/२४) दाखल केल्याने त्यांना एका दिवसातच जामीन मिळाला. या निर्णयाविरोधात जळगाव जिल्हा एकता संघटनेतर्फे माननीय पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांच्याशी चर्चा करून जळगाव शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना भेटून फिर्यादी सलीम खानचे पुरवणी बयान व एकता संघटनेची लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
एकता संघटनेच्या मागण्या – सखोल चौकशी व कठोर कारवाई
१. जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्याची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करावी.
२. सलीम खानला ठार मारण्याच्या हेतूने ट्रकमध्ये स्फोटक ठेवून त्याचा उपयोग करण्यात आल्याने आरोपींवर हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा नोंदवावा.
३. आरोपींनी बॉक्सवर खोट्या नावांचा वापर करून समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करावा.
४. स्फोटक तयार करण्यात मदत करणाऱ्या मास्टरमाइंडला शोधून त्याला तातडीने अटक करण्यात यावी.
संघटनेचे सदस्य उपस्थित
जळगाव जिल्हा एकता संघटनेचे जिल्हा समन्वयक फारूक शेख यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे सदस्य नदीम मलिक, मजहर पठाण, सलीम इनामदार, युसुफ खान, अन्वर खान, मुजाहिद खान, वसीम अली, माजिद खान, जावेद खान, रफिक वायरमन, अख्तर शेख, वसीम शेख, मोहसीन युसुफ आणि इतर सदस्य उपस्थित होते.
शहरात शांतता राखण्यासाठी एकता संघटनेची तातडीची मागणी
Leave A Comment