जळगाव, दि. 24 (ग्लोबल न्यूज 24 लाईव्ह): महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. मतदान शांततेत व निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मतदानाच्या दिवशी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
आदेशानुसार, विधानसभा निवडणूक कायदा 1951 चे कलम 135(C) आणि महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये, जिल्ह्यात 18, 19, 20 आणि 23 नोव्हेंबर हे ‘कोरडे दिवस’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.
त्यानुसार, 18 नोव्हेंबर सायंकाळी 6 वाजेपासून पुढील 48 तास मद्यविक्री बंद राहील. यामध्ये 19 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर संपूर्ण दिवस ‘कोरडे दिवस’ असतील, तर मतमोजणीचा दिवस, 23 नोव्हेंबर, देखील मद्यविक्रीसाठी बंद राहणार आहे.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी निर्देश दिले आहेत की, सर्व अनुज्ञप्तीधारकांनी या आदेशाचे काटेकोर पालन करावे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांच्या अनुज्ञप्ती महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 54 आणि 56 अन्वये तात्काळ रद्द करण्यात येतील.
Leave A Comment