घरांची मनमानी तोड़फोड़ थांबवणयासाठी  सुप्रीम कोटचे आदेश “संविधान जिंदाबाद”च्या घोषणा
जळगाव – बुलडोझरच्या मनमानी कारवाईला आळा घालण्यासाठी सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. न्यायमूर्ती गवई यांनी आदेश दिला की, कोणाचेही घर शिक्षेच्या नावाखाली हिसकावणे हे संविधानाच्या विरोधात आहे. त्यांनी स्पष्ट केले की अन्याय करणे व कायद्याची भाषा करणे अयोग्य आहे. यासोबतच कोणत्याही अधिकार्‍याने अशी मनमानी केली तर त्याच्याविरोधात कोर्टाचा अवमान खटला चालवला जाईल, तसेच नुकसान भरपाई वैयक्तिक रीत्या देण्याचे निर्देशही आदेशात देण्यात आले आहेत.
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे जळगाव जिल्हा एकता संघटनेकडून स्वागत करण्यात आले. या वेळी “संविधान जिंदाबाद” आणि “नहीं चलेगी, नहीं चलेगी हुकूमशाही नहीं चलेगी” अशा घोषणा देऊन न्यायालयाच्या निर्णयाचा आदर व्यक्त करण्यात आला.
संघटनेचे समन्वयक फारुख शेख यांनी सर्वप्रथम निर्णयाचे वाचन करून उपस्थितांना मुख्य सारांश समजावून सांगितले. यानंतर, बुलडोझर सह एकता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुलडोझर संस्कृतीचा निषेध केला. 
उपस्थित पदाधिकारी आणि सदस्य
कार्यक्रमात मुफ्ती खालिद खाटीक, समन्वयक फारुख शेख, संघटक मझरखान, अनवरखान, नदीम मलिक, युसुफ खान, अशफाक चंदानी, कासिम उमर, सलीम इनामदार, शाहिद सय्यद, जलाल शेख, अझहर शेख, इमरान बागवान, सोनू कडक, आदिल पठाण, अशफाक शेख, शेख रेहान, नूर इरफान मेहबूब, सय्यद गयासोद्दीन, काझी इमरान शेख, रहीम शेख, जावेद शेख, मजीद आदींसह अनेक सदस्य उपस्थित होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *