जळगाव: डॉ.मोईझ देशपांडे यांची पुन्हा एकदा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड
शिवसेनेच्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी डॉ. मोईझ देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय श्री गुलाबराव जी पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, श्री. मंगेश चिवटे  यांच्या आदेशाने आणि  श्रीराम राऊत व जितेंद्रजी गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे.  
डॉ. मोईझ देशपांडे यांचा समाजसेवेतला मोलाचा वाटा आणि गरीब-गरजू रुग्णांसाठी त्यांनी केलेल्या वैद्यकीय सेवेचा उल्लेखनीय इतिहास लक्षात घेता, त्यांना पुढील काळात या जबाबदारीसाठी निवडण्यात आले आहे.  
गरीब आणि गरजू रुग्णांसाठी अहोरात्र कार्यरत*
डॉ. मोईझ देशपांडे हे जळगाव जिल्ह्यातील एक आदर्श डॉक्टर म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक गरीब रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून दिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक रुग्णांनी महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत मोफत शस्त्रक्रियांचा लाभ घेतला आहे.  
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून विशेष कार्य
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून *श्री जितेंद्र जी गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर देशपांडे यांना एक भक्कम, रुग्णसेवासाठी अहोरात्र झटणारी अशी टीम मिळाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री गुलाबरावजी पाटील हे जिल्ह्यात वैद्यकीय मदत कक्षाचे आधारस्तंभ आहेत.*श्री मंगेशची चिवटे* यांना ही टीम आपले आदर्श मानून 24तास रुग्णांसाठी उपलब्ध असते आणि धर्म जात पक्ष न बघता प्रत्येकासाठी सेवा देण्याची काम ही टीम करते.
डॉ. देशपांडे यांची नवीन भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. जळगाव जिल्ह्यातील वैद्यकीय मदद देण्यासाठी ते अहोरात्र तत्पर असतील. पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री निधी आणि इतर धर्मादाय ट्रस्टच्या सहाय्याने गंभीर रुग्णांना आवश्यक आर्थिक मदत मिळवून देण्याचे काम ते प्रभावीपणे करतील. 
सामाजिक सेवेमध्ये उल्लेखनीय कार्य
डॉ. देशपांडे यांचे समाजसेवेतील योगदान हे प्रेरणादायी आहे. जळगाव जिल्ह्यातील रक्ताचा तुटवता बघता त्यांनी रेड प्लस ब्लड बँक जळगाव जिल्ह्यात सुरू केली आणि त्या माध्यमातून दररोज रक्ताची गरज भासणाऱ्या अनेक रुग्णांना अहोरात्र मदत करत आहेत.आर्थिक दुर्बल घटकांसाठी त्यांनी धर्मादाय रुग्णालयांमध्ये राखीव खाटा, मोफत शस्त्रक्रिया, तसेच सवलतीच्या दरात उपचार यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे अनेक गोरगरीब रुग्णांचे प्राण वाचले आहेत.  
डॉ. मोईझ देशपांडे यांची ही निवड जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असून त्यांच्या नेतृत्वाखाली गरजू रुग्णांना अधिकाधिक मदत मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *