जळगावात प्लास्टिक बंदी असूनही पेपर कपचा सर्रास वापर सुरू: कर्करोगाचा धोका, प्रशासनाचा हलगर्जीपणा
ग्लोबल न्यूज़ 24 लाइव जळगाव,   
थंडीच्या दिवसात चहा पिणे सर्वांनाच आवडते परंतु, चहा पिताना वापरले जाणारे प्लास्टिक व पेपर कप आपल्या आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण करत आहेत. सरकारने आधीच या कपांवर बंदी घातली आहे, तरीसुद्धा ते खुलेआम वापरले जात आहेत.  
विशेषतः पेपर कपमध्ये असलेली प्लास्टिकची पातळ थर गरम चहाच्या तापमानामुळे वितळून चहामध्ये मिसळते आणि त्यातून हजारो प्लास्टिकचे सूक्ष्म कण आपल्या शरीरात जातात. हे कण केवळ पोटाच्या विकारांपुरते मर्यादित राहत नाहीत, तर लिवर, मेंदूवर परिणाम करून कर्करोगासारख्या आजारांना आमंत्रण देतात.
  
सरकारी नियम आणि न्यायालयाचा आदेश
सरकारने पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ अंतर्गत प्लास्टिक उत्पादनांवर बंदी घातली आहे. महाराष्ट्रात ही बंदी २०१८ मध्ये लागू करण्यात आली.  
– कलम १५: प्लास्टिकचा कप व पेपर प्लास्टिक वापर किंवा विक्री करणाऱ्यांना २५,००० रुपये दंड व ३ महिने कारावासाचा प्रावधान.  
– कलम ५: पर्यावरणाला धोका पोहोचवणाऱ्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा आदेश.  
सुप्रीम कोर्ट आणि नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल (NGT) यांनीही या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.  
जळगाव शहरात हे पेपर कप खुलेआम विकले जात असून सर्रासपणे वापरले जात आहेत. महापालिका आणि संबंधित विभागांच्या दुर्लक्षामुळे सरकारी आदेश केवळ कागदावरच राहिला आहे. प्रश्न असा आहे की, बंदी असूनही हे कप बाजारात कसे विकले जात आहेत? 
 
कर्करोगाचा धोका आणि जबाबदारी कोणाची? 
पेपर कप मध्ये प्लास्टिकचे कण शरीरात गेल्यामुळे यकृत, मेंदू व पचनसंस्थेवर गंभीर परिणाम होतो. वेळेत यावर नियंत्रण न मिळवल्यास, कर्करोगासारख्या लक्षणांचा धोका वाढतो.  
. जळगाव महापालिका: शहरात बंदी घालण्यात आलेल्या उत्पादनांची विक्री रोखण्याची जबाबदारी.  
– जळगाव शहरात प्लास्टिक व पेपर कपची विक्री त्वरित बंद करण्यात यावी.  
– महापालिका व संबंधित विभागांनी नियमित तपासणी मोहिमा राबवाव्यात.  
– प्लास्टिक व पेपर कपच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम याबद्दल लोकांना जागरूक करावे.  
– नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंड व कायदेशीर कारवाई सुनिश्चित करावी.  
  
आपल्याला प्लास्टिक व पेपर कपचा वापर थांबवून पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. मातीचे कुल्हड किंवा स्टीलचे ग्लास वापरण्याची सवय लावावी.  
सरकार व प्रशासनाला आवाहन आहे की, बंदीची अंमलबजावणी कठोरपणे केली जावी, जेणेकरून जळगावातील नागरिक प्लास्टिकच्या धोक्यांपासून आणि कर्करोगासारख्या आजारांपासून वाचू शकतील.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *