0

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: २२ लाखांच्या १४ बाइक आणि ६ ऑटो रिक्षा चोरी करणारी टोळी पकडली
ग्लोबल न्यूज 24 लाइव्ह:
जळगाव जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १४ मोटरसायकल आणि ६ ऑटो रिक्षा चोरी करणाऱ्या टोळीतील तीन सदस्यांना अटक केली आहे.
जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या सीसीटीएनएस क्रमांक १९५/२०२२ अंतर्गत तपासादरम्यान परगुप्त ला माहिती मिळाली की धरणगाव येथील शनी नगर परिसरात कमी पैसे मधे गाडी विकतात ही गुप्त माहिती प्रवीण भालेराव यांना मिळाली,त्यांनी आपल्या सहकाऱ्री संगपाल तायडे मुरलीधर धनगर सागर पाटील व प्रदीप चौरे यांनी मिळून पालधी येथून मुस्तकीन अजीज पटेल, व अमीन काळू मणियार, जाबीर सलामत शेख मालेगाव येथून आरोपींना अटक केली.
चौकशीदरम्यान आरोपींनी कबूल केले की, त्यांनी जळगाव, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, खार, जुहू आणि गुजरात यासह अनेक शहरांतून महागड्या मोटरसायकल आणि ऑटो रिक्षा चोरल्या होत्या आणि त्या विविध शहरांत विकल्या आहे, पोलिसांनी त्यांच्याकडून  २२,४०,००० रुपयांच्या १४ मोटरसायकल आणि ६ ऑटो रिक्षा जप्त केल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड  साहेब, यांच्या मार्गदर्शन वरून उपनिरीक्षक पोटे साहेब, प्रवीण भालेराव पाटिल यांच्यासोबत संगपाल तायडे, मुरलीधर धनगर, सागर पाटील प्रदिप चौरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अटक केलेले सर्व आरोपी सध्या जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात असून न्यायालयीन कोठडीत आहेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *