जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा १७ वर्षे वयोगट
मुलांमध्ये अनुभूती तर मुलींमध्ये रुस्तमजी विजयी

सर्वातकृष्ट् खेळाडू आर्या, स्वरा व ओम
श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे सुरू असलेल्या जिल्हास्तरीय आंतर शालेय उर्वरित स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात मुलांमध्ये अनुभूती इंटरनॅशनल स्कूल शिरसोली ने लॉर्ड गणेशा जामनेरचा १-० ने पराभव केला तर मुलींमध्ये रुस्तमजी इंटरनॅशनल शिरसोली ने सेंट अलायसेस भुसावळचा पेनल्टी मध्ये ४-३ ने पराभव करीत विजय मिळविला.

स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू
मुलींमध्ये रुस्तमजीची आर्या व स्वरा दशहरे यांना तर मुलांमध्ये अनुभूतीचा ओम धोते यास उत्कृष्ट खेळाडूचे पारितोषिक देण्यात आले.

तृतीय स्थान
मुलींमध्ये तृतीय स्थानासाठी बुरहानी इंग्लिश मीडियम पाचोरा विरुद्ध एन एस एम विद्यालय पारोळा यांच्यात सामना रंगला व बुरहानी १-० तृतीय स्थान पटकावले.
मुलांमध्ये सेंट मेरी अमळनेरने पंकज ग्लोबल चोपडा वर ३-० ने विजय मिळवत तुतीय स्थान पटकाविले.

 

पारितोषिक वितरण- अतिथी
पारितोषिक समारंभासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक ,शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे व एकलव्यचे श्रीकृष्ण बेलोरकर ,अल इमदास फाउंडेशनचे मतीन पटेल ,जर्जिस फाउंडेशन वरणगावच्या सौ शबिना खान, जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे रवींद्र धर्माधिकारी, बुद्धिबळ चे आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे व वाल्मीक पाटील, जिल्हा संघटनेचे सचिव फारूक शेख व सहसचिव अब्दुल मोहसिन, क्रीडा अधिकारी सुरेश तिरकुदे, यांच्या हस्ते विजेते उपविजेते संघातील खेळाडूंना सुवर्ण, रजत व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.

फोटो कॅप्शन
१)विजयी मुलं आणि मुलींच्या संघासोबत अतिथी

२)विजय व उपवियी विजयी मुलींच्या संघा सोबत अतिथी
३)विजयी व उपविजयी मुलांच्या संघासोबत..

खुर्चीवर बसलेले रवींद्र नाईक, श्रीकृष्ण बेलोरकर, मतीन पटेल, शबीना खान, फारूक शेख व इतर दिसत आहे

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *