IMG_20240819_225944

जळगाव जिल्ह्यात रामगिरी महाराज विरोधात गुन्हा नोंद झालाच पाहिजे, मुस्लिम समाजाचे पोलीस अधीक्षकांना साकडे

संपूर्ण इस्लाम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत  मोहम्मद (स)यांच्याबाबत अपशब्द वापरून त्यांचा व संपूर्ण इस्लाम समाजाचा अपमान करणारे एवढेच नव्हे तर इस्लाम धर्माचा अन्याय व अत्याचार करणारा धर्म म्हणून संबोधणारे रामगिरी महाराज यांच्यावर अद्याप जळगाव जिल्ह्यातील एकही पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद न झाल्याने जळगावातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मुस्लिम समाजाच्या शिष्ट मंडळाने पोलीस अधीक्षक महेश्वर  रेड्डी यांची भेट घेऊन त्यांना जिल्हा वासियांच्या तीव्र स्वरूपाच्या भावना निदर्शनास आणून दिले व त्वरित जिल्ह्यात एका तरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करा अशी मागणी केली.
पोलीस अधीक्षकांचे आश्वासन
सदर प्रकरणी अभ्यास करून व माहिती जमा करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी शिष्टमंडळाला दिले 
भारतीय न्याय संहितानुसार कारवाईची मागणी
भारतीय न्याय संहिता कलम 192, 196, 197, 298, 299, 302, 353 व 356 अनुसार या रामगिरी महाराजांवर गुन्हा नोंदवून त्यावर कारवाई होणे आवश्यक असल्याचे शिष्टमंडळाने आपल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे.
शिष्टमंडळात यांचा होता समावेश
तक्रारदार व समन्वयक जळगाव जिल्हा मनियार बीरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, कुलजमातीचे अध्यक्ष सैय्यद चांद, राष्ट्रवादी (शरद पवार) जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, अल इमदाद फाउंडेशनचे अध्यक्ष मतीन पटेल, ए यु सिकलगर फाउंडेशनचे अध्यक्ष अन्वर खान, प्रहार महानगर अध्यक्ष युसुफ खान, काँग्रेस आय,चे इरफान शेख,  राष्ट्रवादी अजित दादा गटाचे महानगर अध्यक्ष इद्रिस शेख,उस्मानिया फाउंडेशनचे अध्यक्ष रफिक शेख, शिकलगर बिरादरीचे मुजाहिद खान आदींचा समावेश होता.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *