जळगाव मुस्लिम एकता संघटनेच्या प्रयत्नांना यश: रामगिरी वर गुन्हा दाखल
जळगावात रामगिरी महाराजांवर दखलपात्र गुन्हा दाखल
श्री शेत्र गोदावरी धाम बेट मुक्काम पोस्ट सराला तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर चे महंत रामगिरीजी महाराज यांनी मोहम्मद स व यांच्या विरोधात तसेच इस्लाम धर्माच्या बाबत जे अनुद्गार काढले होते व अंतिम प्रेषितांनी बदनामी केली होती त्याबाबत जळगाव शहर व जिल्ह्यात सर्व ठिकाणी मोर्चे निवेदन व आंदोलन करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती परंतु पोलीस प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने जळगाव जिल्ह्यात एकता संघटन नावाने एक संघटना निर्माण झाली व त्यांनी महाराज विरुद्ध दखलपात्र गुन्हा दाखल न झाल्यास २८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर धरणे आंदोलन करू अशा प्रकारची नोटीस दिलेली होती.
त्यावर पोलीस दलाने आज दिनांक २७ ऑगस्ट रोजी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन जळगाव येथे बी एन एस एस संहितेच्या कलम १७३ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १९२,१९६,१९७,२९९,३०२, व ३५६ प्रमाणे एकता संघटनेचे फारुक शेख अब्दुल्ला यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
झालेला आहे .
सदर गुन्हा ०/२४ ने सिन्नर एमआयडीसी पोलीस स्टेशनला पुढील कारवाईसाठी सादर केलेला असून पुढील तपास सिन्नर एम आय डी सी पोलीस स्टेशन करणार आहे.
*फारुक शेख यांची फिर्याद*
रामगिरी महाराज यांनी 15 ऑगस्ट च्या रेंट ड्रॉप या युट्युब वर तीन मिनिट आठ सेकंदाच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपले प्रचार व प्रसार करताना त्यांनी इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित यांच्या जीवन चरित्राबाबत तसेच त्यांच्या धर्मपत्नी आयशा (रजी) व इस्लाम धर्म हा कसा अत्याचारी आहे याबद्दल बोलून इस्लाम धर्मियांच्या भावना दुखावल्या होत्या त्यामुळे दोन समाजात ते निर्माण होऊन त्यांच्या या वक्तव्यामुळे निरनिराळ्या गटात शत्रुत्वता वाढली असून एकोपा टिकण्यास बाधकपूर्ती केलेली होती. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बाधक असे अभ्यास प्रपादन झालेले आहे, अशा त्यांच्या या खोट्या असत्य वक्तव्यामुळे इस्लाम धर्माचा व इस्लामिक श्रद्धांचा अपमान करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने बुद्धी परस्पर व दुष्ट हेतूने प्रवचनाद्वारे कृती केलेली आहे, त्यामुळे इस्लाम धर्माचा अपमान झालेला आहे. त्यांच्या वक्त्याव्या मुळे इस्लाम धर्मियांच्या व्यक्तीच्या कानावर पडेल अशा तऱ्हेने व्हिडिओ प्रसारित केलेला आहे त्यांच्या या घातकपणे व बेचुट पणे ही विधाने आहेत त्यावरून मुस्लिम धर्मीयांना प्रक्षोभित करील व अशा प्रक्षेपणामुळे दंग्याचा अपराध घडावा असा त्यांचा उद्देश असावा किंवा तसे घडणे संभवनीय असल्याची जाणीव महाराजांना असताना सुद्धा त्यांनी असे कृत्य केले त्यामुळे इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित मोहम्मद स व यांची अब्रू नुकसान केले आहे म्हणून माझी त्यांच्या विरोधात लेखी तक्रार असल्याचे फारुक शेख यांनी आपल्या तक्रारीत नमूद केल्याने वरील प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे.
फोटो
१)एफ आय आर ची प्रत फारुक शेख यांना देताना सहा पोलीस निरीक्षक मोरे सोबत एकता संघटनेचे कार्यकर्ते दिसत आहे.
२)पोलीस स्टेशन मध्ये एकत्रित झालेले संघटनेचे कार्य करते
Leave A Comment